To “Reflex” (2010-11):

मी व माझी बाईक
“Go babelicious”.TVवरची जाहिरात बघताना मनातील ती छुपील इच्छा परत जागृत झाली.स्वत:ची बाईक.आई-बाबाचं डोकं खाण्याचं हे सलग दुसरं वर्ष.धड चालवता न येता स्वत:ची मस्त टू व्हीलर असण्याचं स्वप्न बघणं गुन्हा तर नव्हे ना? पण हे आमच्या पालकांना कोणी समजवायचं?आणि माझे मातृपितृभक्त बंधुभगिनींनीसुध्दा त्यांचीच री ओढली.ही अतृप्त मनोकामना परत बासनात गुंडाळून ठेवण्याच्या स्थितीत असताना एक आशेचा किरण दिसला.

माझ्या मैत्रिणीने घेतली ब्रँड न्यू विगो.आता माझ्या कृश शरीरयष्टीला ती शोभेलशी वाटत नव्हती.पण मनापुढे शरीराचं काही चाललं नाही.मैत्रिणीला भेटण्याच्या बहाण्याने माझा बिनदिक्कीत “बाईक ट्यूशन क्लास” चालू झाला.

पहिलाच दिवस.साईकल चालवता येण्याचा अतिआत्मविश्वास नडला आणि स्वयंघोषित “फ़ास्ट लर्नर”नं नवीकोरी बाईक स्पीडब्रेकरवर पलटवली.मैत्रीतील दृढता(?) कामी आली आणि जीवावरचं शेपटीवर निभावलं.
घरी कळताच मे मध्येच शिमगा सुरू झाला.सतत चाललेल्या शीतयुद्धाचा परिणाम म्हणून सरतशेवटी बाईक आणण्यावर,नाखुशीने का होईना,शिक्कामोर्तब झालं.

आता प्रश्न कोणती बाईक? आघाडीच्या पत्रकाराप्रमाणे ब-याचजणांच्या मुलाखती घेऊन झाल्या.सर्वगुणसंपन्न अशी बाईक,ती ही खिशाला जास्त चाप न लावता मिळणं म्हणजे एक दिव्यच होतं.हो न हो करता ब-याच रिसर्चनंतर आम्ही डियो फ़ाइनलाइज केली.कपाटात तळाला गेलेल्या कागदपत्रांची जमवाजमव करून आमची स्वारी बुकिंगला निघाली.मस्त रंग निवडला.पण डीलरचे “कमीतकमी चार महिने लागतील” हे उद्गगार ऎकून नजरटप्प्यातील बाईक धूसर दिसू लागली.बिनइस्त्रीचा लटकलेला चेहरा घेऊन वरात घरी आली.दिवास्वप्नं बघत बघत मी बाईककलेचा गाढा अभ्यास सुरू केला.रस्त्यावरील मुक्या तश्याच बोलक्या जीवांचे शिव्याशाप खात माझी दोन चाकांची कसरत जोमात चालू झाली.

अशातच तो दिवस उजाडला.डीलरचा कॉल आला.क्षणातच आकाश ठेंगणं वाटू लागलं.सर्व सोपस्कार पूर्ण करून बाईकनं आपलं पाऊल…आय मीन..चाक आमच्या अंगणात ठेवलं.पूजेनंतर ती अगदी नव्या नवरीप्रमाणे नटली.वेगवेगळ्या पोजेसमध्ये सगळ्यांनी तिच्याबरोबर फोटो काढून घेतले आणि अतिप्रतिक्षित “माझ्या” बाईकची सफ़र सुरू झाली.

कॉलेजचा बाईकचा पहिला दिवस.एवढ्या दिवसांत बाईक चालवतांना जेवढी भरली नव्हती तेवढी हुडहुडी आपली बाईक कॉलेज नेण्याच्या नुसत्या विचारानेच भरली.आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये कामी येण्यासाठी म्हणून मैत्रिणीला बॅकसीटवर बसवलं.त्याआधी तिची जीवन विमा पॉलिसी असल्याची खात्री करून घेतली!नऊ देवांना नवस करून आपापला जीव मुठीत घेऊन दोन्ही वीरांगना युध्दावर निघाल्या.दुतर्फा झाडीतून खाचखळग्यांतून वाट काढत सफर सुरू झाली.आज रस्ता वेगळाच भासत होता.समस्त जग कुतुहलाने बघत होते. सा-या निर्जीव वस्तू मिश्किल हसत होत्या.विनाकारण हॉर्न वाजवून कित्येकांच्या कपाळावर आठ्या चढवल्या.काही वात्रटांचा अपवाद वगळता मस्तपणे मजा लुटत आमचा दोन चाकांचा रथ कॉलेज पोहोचला.

नव्याची नवलाई म्हणून सर्वांना बाईक दाखवून झाली.दोघा-तिघांना घेऊन कॉलेजला राऊंड मारून बढाई दाखविली.लेक्चरला बसल्यावर माझा अर्धा जीव बाईकमध्येच अडकला.बाईक पडली तर नसेल ना?कोणी पार्क करत असताना तिला scratchतर घातला नसेल ना?अशा अनंत शंकाकुशंकानी डोक्याचा भुसा केला.कॉलेज संपल्यावर धड कुणाचा निरोप न घेता मी धावतपळत बाईककडे आले.तर काय?बाईक माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसू की हो लागली!!

किरकोळ अपघात व झडप वगळता आजही बाईकची जादू कायम आहे आणि ती अशीच सदासर्वदा ताजीतवानी राहू दे हीच झाडून सर्व देवांच्या चरणी प्रार्थना!

इति सातां उत्तरांची कहाणी,बाईकपुराण सुफळ संपूर्ण!

अपूर्वा नाईक

तृतीय वर्ष

इलेक्ट्रोनिक्स व टेलेकम्युनिकेशन

1 thought on “To “Reflex” (2010-11):

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this:
search previous next tag category expand menu location phone mail time cart zoom edit close